लंडन : लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे.
मुलींच्या पालकांनी मात्र शाळेच्या या निर्णयाला विरोध केला असून, हा त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, मुलींचा बराच वेळ पोशाखाची निवड करण्यात आणि मेक-अप करण्यात जात असल्याने त्यांचे अभ्यासाकडे कमी लक्ष लागते, असा शाळेचा दावा आहे.
रोज साधेपणाने राहिल्याने विद्यार्थ्यांचे मुख्य गोष्टीकडे लक्ष लागून वाया जाणारा वेळ वाचतो, असं सुलभ कारण संस्थेने दिले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.