महिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता

जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.

Updated: May 31, 2015, 09:24 AM IST
महिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता title=

इस्लामाबाद: जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.

एका वेबसाईटच्या बातमीनुसार पाकिस्तानी इस्लामिक पॉलिटिकल पार्टी जमीयत उलेमा-ए-फज्ल (JUI-F)च्या या नेत्यानं म्हटलं, 'भूकंपापासून महागाईपर्यंत सर्व संकटांना महिलांनी सोडलेली लाज जबाबदार आहे. एक महिला जी डोक्यापासून पायापर्यंत झाकलेली नसते की आपल्या देशातील लोकांसाठी चालतं फिरतं हत्यार आहे आणि पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये असे मिसाईल उपस्थित आहेत.'

रेहमान यांच्या मते, पाकिस्तानातील जनतेची सुरक्षा संकटात आहे. रेहमान यांनी पाकिस्तानी पंतप्रधान आणि आर्मी चीफ यांच्याकडे महिलांच्या अशा वागण्याबद्दल कारवाई करण्याची आणि त्यांच्या जिन्स घालण्यावर बंदी घालण्याची मागणी केलीय.

जर या महिलांना पूर्ण कपडे घालून आपल्या घरातच ठेवलं तर आपले तालिबानी बंधू पाकिस्तानवर हल्ला करतील, असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्नही या नेत्यानं विचारला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.