अनाकोंडा खाणार माणसाला लाइव्ह, इंटरनेटवर खळबळ

 एक धाडसी युवा अमेरिकन प्रकृती वैज्ञानिक आणि फिल्मकाराने इंटरनेटच्या जगात खळबळ माजवली आहे. त्याचा दावा आहे की एका टीव्ही शोसाठी त्याने स्वतःला एका विशाल अनाकोंडा सापाचं भोजन बनण्याची तयारी दाखवली आहे.

Updated: Nov 7, 2014, 12:44 PM IST
अनाकोंडा खाणार माणसाला लाइव्ह, इंटरनेटवर खळबळ title=

नवी दिल्ली:  एक धाडसी युवा अमेरिकन प्रकृती वैज्ञानिक आणि फिल्मकाराने इंटरनेटच्या जगात खळबळ माजवली आहे. त्याचा दावा आहे की एका टीव्ही शोसाठी त्याने स्वतःला एका विशाल अनाकोंडा सापाचं भोजन बनण्याची तयारी दाखवली आहे.

एका नव्या शोच्या प्रचारासाठी ट्विटरवर पोस्ट केलेल्या ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की, मी पॉल रॉजोली आहे, मी असा पहिला व्यक्ती आहे की ज्याला अनाकोंडा जिवंत खाणार आहे. ‘इटन अलाइव्ह’ या नावाने हा शो सात डिसेंबरला डिस्कव्हरी चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे.

पाहा व्हिडिओ 

या शोच्या प्रचारासाठी व्हिडिओ यू ट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रॉजोली मानवभक्षी सरीसृपचा आहार बनण्यासाठी एक ‘स्नेक प्रुफ सूट’ परिधान करताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही विषय चर्चीला जात हे. पण प्राण्यांच्या अधिकारांसाठी आवाज उठविणारी संघटना पेटाने हा शो डिस्कव्हरी चॅनलने प्रसारित न करण्याची मागणी केली.  

पेटाने म्हटले की, फिल्म निर्मात्याची योजना काहीही असो, शेवटी किंमत सापाला मोजावी लागणार आहे. मनोरंजनासाठी प्राण्यांचा उपयोग करताना नेहमी असे होते. दक्षिण आफ्रिकन उष्ण कटिबंधीय जंगलात सापडणारा ग्रीन अनाकोंडा जगातील सर्वात विशाल साप आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.