अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे

अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

Updated: Jun 13, 2016, 10:07 AM IST
अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे title=

मुंबई : अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

यासोबतच या चित्रपटाने आतापर्यंत ८८.८५ कोटी रुपयांची कमाई केलीये. यासोबतच हाऊसफुल ३ने शाहरुखच्या फॅनलाही मागे टाकलेय. दुसऱ्या आठवड्यापर्यंत शाहरुखच्या फॅनने ८२ कोटींची कमाई केली होती. 

तसेच अक्षय कुमारचा हाऊसफुल ३ हा या वर्षातील दुसरा जबरदस्त कमाई करणारा चित्रपट ठरलाय. आता अक्षय़चा हा चित्रपट त्याच्याच एअरलिफ्टला कमाईच्या बाबतीत मागे टाकणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.