मुंबई : राखी सावंत नेहमी तिच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या एका ब्रायडल शूटदरम्यान तिला लग्न आणि मुलांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सारेच हैराण झाले.
या वयात लग्न कोण करेल. मात्र सरोगसीच्या सहाय्याने मी आई बनणार नाही. लग्न न करताही आई होऊन दाखवेन, असं राखी म्हणाली. ते कसं शक्य होणार आहे हे तिलाच माहित. मात्र तिच्या या विधानानंतर पुन्हा एकदा ती चर्चेत मात्र आलीये.
मोठ्या कालावधीनंतर राखी एक कहानी जूली या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट शीना बोरा हत्याकांडवर आधरित आहे. यात राखी इंद्राणी मुखर्जीच्या भूमिकेत दिसणार आहे.