मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफअली खानच्या अंगठ्याला चित्रपटाच्या शूटिंगवेळी दुखापत झाली आहे. मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सैफच्या अंगठ्याचं छोटं ऑपरेशनही करण्यात आलं. लवकरच सैफला हॉस्पिटलमधून सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, अशी प्रतिक्रिया सैफची बहिण सोहाअली खाननं दिली आहे. डॉक्टर सांगतिल तेव्हाच त्याला डिस्चार्ज मिळेल असंही सोहा म्हणाली आहे.
याआधी रंगून चित्रपटाच्या शूटिंगवेळी आणि एजंट विनोद चित्रपटाचा अॅक्शन सीन शूट करतानाही सैफ जखमी झाला होता.