गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. 

Updated: Oct 2, 2014, 12:10 AM IST
गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी title=

मुंबई: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. 

आर.आर.पाटील यांनी केलेल्या जातीयवादी वक्तव्यानंतर ते स्वत: किती जातीयवादी आहे, हे कळतं, असं गडकरी म्हणाले. 

गडकरींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे - 

  •  युती तुटण्याचं दु:ख... का चर्चेत सहभागी झाले नाही गडकरी... पाहा काय म्हणतायेत...
  • सर्वच नेत्यांना वाटलं युती राहावीच...
  • निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेसोबत जाणार? गरज पडल्यास शिवसेनेसोबत पुन्हा जाणार
  • बाळासाहेब आमचे आदरणीय... बाळासाहेब दिलदार... 
  • बाळासाहेब दिलदार... आमचा विरोधी पक्ष फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी
  • भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण?
  • मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही... आमच्याकडे खूप चेहरे आहेत... 
  • आयाराम-गयारामांवर काय म्हणतायेत गडकरी?
  • मी जीव देईल, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही- गडकरी
  • जातीचं राजकारण आम्ही करत नाही, आबांबद्दलचा समज चुकीचा ठरला, तेच जातीयवाचक... 
  • आर.आर.पाटील यांनी फडणवीसांची आणि माझी जात काढली, याचं वाईट वाटलं... आम्ही विकासाचं राजकारण करतो, जातीचं नाही...
  • फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा अपमान करणारं आर. आर. पाटील यांचं वक्तव्य
  • महाराष्ट्रातील टोलजनक काय म्हणतायेत टोलबद्दल... रस्ते चांगले नाही तर टोल का घेतात?
  • टोलबदद्ल विशेष भूमिका ठरवलीय... ती आमचं सरकार आल्यावर टोलचा योग्य तो निर्णय घेऊ...
  • मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केल्यानं माझं तिकीट कापलं- प्रकाश शेंडगे पाटील
  • मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केल्यानं माझं तिकीट कापलं- प्रकाश शेंडगे पाटील, मात्र स्थानिक नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध होता, म्हणून तिकीट मिळालं नाही - गडकरी
  • राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत काय म्हणणं आहे गडकरींचं ऐका...
  • महाराष्ट्राच्या विकासासाठी भरपूर काम करायला तयार, पण पृथ्वीराज चव्हाणांनी काहीच पुढाकार घेतला नाही...
  • सुखी, संपन्न महाराष्ट्राचा त्यांनी नुकसान केलं... निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण...
  • काँग्रेस-राष्ट्रवादीनं अखेरच्या तीन महिन्यात, शेवटच्या आठवड्यात घेतलेले निर्णय रद्द करणार...
  • राणे, राज ठाकरे चांगले मित्र... व्यक्तीगत संबंध चांगले, उद्धव ठाकरेंसोबतही व्यक्तिगत संबंध चांगले... 
  • उद्धव ठाकरेंनी मध्यरात्रीही मला फोन करून दिल्लीत काही काम सांगतील, तर मी धावून जाईल - गडकरी
  • मनसेच्या राम कदमांबाबत काय घडलं...सांगतायेत गडकरी... 
  • राज ठाकरेंनी सभेत सांगितलेलं खरं... त्यांनी मला फोन केला होता, हे तुमचे उमेदवार इकडे आले म्हणून -गडकरी
  • रस्ता बांधकामाबद्दल काय म्हणतायेत गडकरी?
  • फक्त विदर्भाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे...
  • देवेंद्र फडणवीससोबत मतभेद नाही... पाहा कसे आहेत दोघांचे संबंध.. काय सांगतायेत गडकरी...
  • महाराष्ट्रातील काही राजकारण्यांनी मुद्दाम हे पसरवलं... देवेंद्र खूप कर्तृत्ववान कार्यकर्ता... मी त्याच्यामागे खंबीर उभा आहे... 
  • पंकजा मुंडेंचा वारसा चालवेल, ती कर्तृत्ववान आहे... काय म्हणाले पंकजा मुंडे बद्दल...
  • कसे आहेत नेमके गडकरी... काय सांगितलं स्वत:बद्दल... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.