शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ

शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Updated: Oct 11, 2014, 07:12 PM IST
शिवसेनेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा व्हिडिओ title=

मुंबई : शिवसेनेच्या आजपासून विविध चॅनल्सवर झळकत असलेल्या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ टाकून शिवसैनिकांना आणि मराठी माणसांना साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

बाळासाहेबाचा या व्हिडिओच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्नाची आठवण करू देण्यात येत आहे.

काय म्हटले बाळासाहेब या जाहिरातीत

लोकसभेची निवडणूक झाली आणि आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. आणि खरी लढाई आता आपली सुरू होत आहे. लोकसभेला विजय प्राप्त करून दिला आणि त्या पेक्षाही महत्वाची विजय आणि त्याची तयारी आज पासून त्या कामाला आपल्याला लागायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत भगवा झेंडा हा विधानसभेवर फडकला पाहिजे, हे माझं वचन नाही हे तुम्ही मला वचन दिलं पाहिजे. आणि भगवा विधानसभेवर फडकवणारचं...

पाहू या बाळासाहेबांचा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.