जालन्यात दानवेंना मोठा धक्का

  जालना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेना मोठा धक्का बसलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 21, 2017, 05:34 PM IST
जालन्यात दानवेंना मोठा धक्का  title=

जालना :   जालना जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेना मोठा धक्का बसलाय. 

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीनं भाजपला सत्तेपासून वंचित ठेवलंय. सेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष बनलेत. 

रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर असे दोन दिग्गज नेते जालन्यातच असताना सेना उमेदवार अनिरुद्ध खोतकरांना 34 मतं मिळालीत. तर उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झालीय. 

खोतकरांविरोधात निवडणूकीत उतरलेल्या भाजपच्या अवधूत ख़डकेंना 22 मतं मिळाली आहेत.