आईने मुलाचा वायरने गळा आवळून केला खून

पुण्यात एका आईने क्रिकेट बॅट मारुन मुलाचा जीव घेतला ही घटना ताज़ी असतानाच डोंबिवली देखील एका आईने व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Updated: Aug 8, 2015, 01:12 PM IST
आईने मुलाचा वायरने गळा आवळून केला खून title=

डोंबिवली : पुण्यात एका आईने क्रिकेट बॅट मारुन मुलाचा जीव घेतला ही घटना ताज़ी असतानाच डोंबिवली देखील एका आईने व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण आपल्या मुलाचा खून केला ही माहिती स्वत: मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन दिली. पोलिसांनी आईला अटक केली.

प्यारीदेवी चौधरी ही पतीच्या निधनानंतर आपल्या तीन मुलांच्या सोबत जुनी डोंबीवली येथील पार्वती निवासमध्ये राहत आहे. पतीच्या निधनानंतर तीन मुलांचा तिने सांभाळ मोठ्या कष्टाने केला. मात्र अशोक वडिलांच्या निधनानंतर वाया गेला. त्याला वाईट संगत लागली आणि त्यासंगतीमुळे त्याला दारु, गांजाची व्यसने लागलीत. तो व्यसनासाठी पैसे मागू लागला. पैसे दिले नाहीतर आई आणि लहान भावाना मारहाण करणे, पैसे चोरून घेणे, पैसे मिळाले नाही तर घरातील कोणतीही वस्तू  विकुन आपले व्यसन करणे आदी प्रकारामुळे कुटुंब त्रस्त होते.

रागाच्या भरात आईने हे कृत्य केल्याचे पोलीस यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.