नाशिक : नाशिकमधल्या कथित बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून लोकांनी शांतता राखावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
या प्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल आणि आरोपीवर योग्य करवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर पवारांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलंय. लोकाचा संताप समजू शकतो, पण प्रत्येक गोष्टीला पूर्णविराम देण्याची वेळ असते असं पवार म्हणाले.
शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बट्टा लागणार नाही, याची खबरदारी जनतेने घ्यावी, असं आवाहन पवारांनी केलंय. काल रात्रीपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नाशिक-त्र्यंबक महामार्ग ठप्प झाला आहे.