औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सकाळी फटाका मार्केटला लागलेल्या आगीनंतर संध्याकाळी या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. आगीनंतर बेचिराख झालेले मार्केट पाहण्यासाठी तरुणांची गर्दी झाली होती.
जळालेली दुकानं, गाड्यांचे फोटो काढण्यासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.. फक्त शहरातील नाही, तर परिसरातील गावांमधूनसुद्धा अनेकजण इथं आले होते. या जागेवर आगीनंतर काय परिस्थिती हे पाहण्यासाठी इथे सारे जमले होते..
संध्याकाळी तर या ठिकाणी जत्रा भरल्यासारखी अवस्था झाली होती.. या बघ्यांच्या गर्दीमुळं पंचनामा करणा-या पोलिसांची आणि सरकारी अधिका-यांची चांगलीच दमछाक होत होती.