बातम्या मनोरंजकतेने मांडण्याचा ट्रेंडबद्दल चिंता - डॉ. निरगुडकर

बातम्या मनोरंजन पद्धतीने दाखवण्याचा वृत्त वाहिन्यांनाचा मोह अलीकडच्या काळात वाढत चालला आहे. त्याच बरोबर प्रेक्षक देखील अशा मनोरंजक पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या बातम्यांना पसंती अधिक देत आहेत. हा बदल चिंताजनक असल्याचे मत झी 24 तास आणि डीएनए चे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले आहे. 

Updated: Jun 7, 2015, 07:25 PM IST
बातम्या मनोरंजकतेने मांडण्याचा ट्रेंडबद्दल चिंता - डॉ. निरगुडकर  title=

पुणे : बातम्या मनोरंजन पद्धतीने दाखवण्याचा वृत्त वाहिन्यांनाचा मोह अलीकडच्या काळात वाढत चालला आहे. त्याच बरोबर प्रेक्षक देखील अशा मनोरंजक पद्धतीने मांडल्या जाणाऱ्या बातम्यांना पसंती अधिक देत आहेत. हा बदल चिंताजनक असल्याचे मत झी 24 तास आणि डीएनए चे संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले आहे. 

पुण्यात डॉक्टर उदय निरगुडकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते. 

आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती दिवशी हा पुरस्कार दिला जातो. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विश्व संवाद केंद्र, पुणे च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते डॉक्टर उदय निरगुडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  

यावेळी विश्व संवाद केंद्र, पुणेचे अध्यक्ष मनोहर कुलकर्णी,  डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विकास काकतकर उपस्थित होते.  इंदुमती गणेश, वैजनाथ दुलंगे यांना देखील यावेळी गौरविण्यात आले. 

देश सकारात्मक मार्गावर चालला आहे. त्यात  माध्यमांची महत्वाची भुमिका राहणार आहे. असे मत नकवी यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकारीतेत , समाजात, तंत्रज्ञान यामध्ये अनेक बदल झाले आहेत.  मात्र, पत्रकारांची अर्थिक स्थिती बदललेली नाही.याविषया नकवी यांनी खंत व्यक्त केली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.