कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अमित शाह यांची मंत्र्यांना तंबी

भाजपचे मंत्री कामं करत नाहीत, मंत्रालयात खेपा घालाव्या लागतात अशा तक्रारींची गंभीर दखल भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत घेण्यात आलीय. म्हणूनच काल झालेल्या अमित शाह आणि भाजप मंत्र्याच्या बैठकीतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला.

Updated: May 24, 2015, 04:39 PM IST
कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अमित शाह यांची मंत्र्यांना तंबी title=

कोल्हापूर: भाजपचे मंत्री कामं करत नाहीत, मंत्रालयात खेपा घालाव्या लागतात अशा तक्रारींची गंभीर दखल भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत घेण्यात आलीय. म्हणूनच काल झालेल्या अमित शाह आणि भाजप मंत्र्याच्या बैठकीतही याच मुद्द्यावर भर देण्यात आला.

कार्यकर्ते काम घेऊन येत असतांना त्यांच्याकडे लक्ष द्या ,अशी तंबी वजा सूचना शनिवारी अमित शाह यांनी भाजप मंत्र्यांना दिली. म्हणूनच आता आठवड्यातील ठराविक दिवस राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

यामुळं सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यकर्ते थेट भाजप मंत्र्यांना प्रदेश कार्यालयात २ ते ५ या वेळेत भेटू शकणार आहेत. राज्य सरकारचे निर्णय हे जिल्हा आणि तालुका पातळीवर पोहचवण्यासाठी आता विशेष समित्याही स्थापन केल्या जाणार असल्याचं कार्यकारणीच्या बैठकीत विनोद तावडे यांनी आज जाहीर केलंय. यामुळं कोणती काम कोणत्या योजनेच्या माध्यमातून केली जाऊ शकतात याची माहिती कार्यकर्त्यांना मिळणार आहे. 

मंत्री आणि कार्यकर्ते यांच्यातील वादाच्या घटना टाळता येणार असल्याची भावना कार्यकारणीमध्ये व्यक्त करण्यात आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.