औरंगाबाद : मराठा आरक्षणाला उशीर होत असल्याने भाजपला धडा शिकविण्याचा निर्णय मराठा मूक मोर्चाने घेतला. भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आलाय.
आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाला भाजपने झुलवत ठेवले आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकविण्याची हिच संधी आहे. त्यामुळे भाजपला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात अनेक जिल्ह्यात लाखोंचे मोर्चे काढूनही सरकारने आरक्षणाच्या मुद्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. उलट भाजप सरकारने मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप मराठा मूक मोर्चाने केलाय. 21 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करु नका, असा ठराव औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा समाजातील मतदारांनी भाजपला मतदान करु नये इतर कुठल्याही पक्षाला मतदान करावे, असे आवाहनही या बैठकीत मराठा समाजबांधवांना केल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.