पुणे: पुणे विभागात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. येत्या पाच वर्षांत म्हाडा पुणे विभागात चाळीस हजार घरं बांधणार आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी ही माहिती दिली आहे.
पुणे विभागात चाळीस हजार घरं उभारण्याचं म्हाडानं लक्ष्य ठेवलं आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून पुण्यात यावर्षी ३० जूनला ४४८ घरांसाठी, म्हाडा सोडत काढणार असल्याचं वायकर यांनी सांगितलं.
पुण्याचा विकास आराखडा राज्य सरकारकडे आला आहे. त्यात म्हाडासाठी जागा ठेवण्याची तरतूद करणार असल्याचंही वायकर यांनी सांगितलं. महाराष्ट्र हाऊसिंग पॉलिसी मे महिन्यात येणार येईल. सध्या या पॉलिसीवर सध्या काम सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.