शरद पवारांना रूबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

(अरूण म्हात्रे, झी मीडिया) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्याच्या रूबी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोळ्यांची रिअॅक्शन झाल्याने त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

Updated: Jan 27, 2016, 11:51 AM IST
शरद पवारांना रूबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज title=

पुणे : (अरूण म्हात्रे, झी मीडिया) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्याच्या रूबी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोळ्यांची रिअॅक्शन झाल्याने त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. (व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

काही दिवस शरद पवारांवर रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, एका जागी बसण्याची सवय नसल्याचं यावेळी शरद पवारांनी सांगितलं, शरद पवार आता मुंबईत काही दिवस आराम करणार आहेत.

वाढत्या वयात, शरद पवारांच्या प्रकृतीच्या तक्रारी साहजिकच वाढल्या आहेत, पण आपल्याला एकेजागी बसण्याची सवय नसल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलतांना शरद पवारांनी सांगितलं.

शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल मागील अनेक दिवसांपासून अफवांना ऊत आला होता, मात्र शरद पवार यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिल्याने या अफवा थांबणार आहेत. शरद पवारांची रूबी हॉस्पिटलमधून सुटका झाल्याने, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.