शिवसेना - भाजप वाद चिघळणार?

शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्य़ासाठी पावलं उचलण्याचं पत्र लिहीलंय. त्यानंतर आता शिवसेनेनंही मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केलंय. 

Updated: May 24, 2016, 09:47 AM IST
शिवसेना - भाजप वाद चिघळणार? title=

नाशिक : शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीचं आता राजकारण सुरू झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्य़ासाठी पावलं उचलण्याचं पत्र लिहीलंय. त्यानंतर आता शिवसेनेनंही मित्रपक्ष भाजपला लक्ष्य केलंय. 

नाशिक शहरात गेल्या चार महिन्यात खुनाच्या २० घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या घरफोडी, सोनसाखळी चोरी टोळक्यांचा धुडगूस सुरू असल्याने नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी मागाणी शिवसेनेनं केलीय. 

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिलय. येत्या आठ पंधरा दिवसात गुन्हेगारी आटोक्यात आली नाही तर शिवसेना पोलीस आयुक्तलायावर मोर्चा काढेल आणि पोलीसदलाला समांतर व्यवस्था उभी करेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिलाय.