युपी, बिहार दहशतवादाचे केंद्र - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला. राज ठाकरे यांनी मुळात काल सापडलेल्या दहशतवाद्यांवर भाष्य केले. दहशतवाद्याचे मुख्य केंद्रस्थान उत्तरप्रदेश आणि बिहार हेच आहे.

Updated: Jan 24, 2012, 04:12 PM IST

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांना हात घातला. राज ठाकरे यांनी मुळात काल सापडलेल्या दहशतवाद्यांवर भाष्य केले. दहशतवाद्याचे मुख्य केंद्रस्थान उत्तरप्रदेश आणि बिहार हेच आहे.

कारण की  उत्तर प्रदेश आणि बिहार येथेच या लोकांना आश्रय मिळतो, इथेच सारे कट शिजतात. अश्या प्रकारे बिहार आणि उत्तरप्रदेशवर टीका करत त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केल. या परप्रांतीयांमुळे मुंबई बकाल तर होतेच, मात्र त्याच बरोबर मुंबई या लोकांमुळे असुरक्षित होते. त्यामुळे परप्रांतीयांच्या लोंढ्यावर आवर हा घातला गेला पाहिजे अशी राज यांनी पुन्हा मागणी केली.

कालच अटक झालेल्या दहशतवाद्यांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर टीका केली आहे. हे जे कोणी दहशतवादी आश्रय घेतात, किंवा यांचे कट  कुठे रचले जातात, बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये. त्यामुळे या इथून येणाऱ्या लोकांवर बंधनं ही घातली गेलीच पाहिजे, त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकींच्या तोंडावर राज यांनी परप्रांतीयांवर टीका केली आहे.