ड्रग्स नाईट, पोलीस करणार चेकिंग टाईट

मुंबईत ३१ डिसेंबर नाईटला ड्रग्सची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर हायटेक पद्धतीचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर ड्रग्स पार्टीच आमंत्रण तरूणांना दिलं जात आहे.

Updated: Dec 30, 2011, 10:13 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत ३१ डिसेंबर नाईटला ड्रग्सची विक्री करण्यासाठी ड्रग्स तस्कर हायटेक पद्धतीचा वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साइटवर ड्रग्स पार्टीच आमंत्रण तरूणांना दिलं जात आहे. ड्रग्स तस्करांचा या नविन कटाचा नविन वर्षाचा स्वागताची रात्र. बेधुंद करणारं म्युझिक, झगमगणारे लाईट्स, वाईन. एक असी रात्र जेव्हा तरूणाई बेधुंद होउन नाचते. पण याच सगळ्या सेलीब्रेशनमध्ये नशेचा सेवन करणारी एक अशीच तरूण पिढी सुद्धा असते ज्याला हवं असतो.

 

तरूणांचा ह्याच व्यसनाचा गैरफायदा घेतात ड्रग्स पेडलर्स. ३१ डिसेंबरला होणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांच आयोजन स्थळाची माहिती तरूणांपर्यंत पोहचवण्यासाठी ड्रग्स तस्करांनी नविन शक्कल लढवली आहे. ड्रग्सचे सौदागर ड्रग्स पार्ट्यांच इनविटेशन देण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करत आहेत. फेसबुक, ऑर्कुट, व्हॅन सह इतर महत्त्वाचा वेबसाईटचा गैरवापर ड्रग्स पेडर्लस करत असल्याची माहिती पोलीसांचा तपासात समोर आली आहे. या सोशल नेटवर्किंग साइटवर ड्रग्स तस्करांनी प्रत्येक ड्रग्सची किंमत आणि पार्टीच ठिकाण लिहलं असतं.

 

मुंबई पोलीस दलाचं सायबर क्राइम सेल ड्रग्स विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या अशा सोशल नेटवर्किंग साइटवर नजर ठेवून आहे. मुंबई आणि शहराचा बाहेर होणाऱ्या काही ड्रग्स पार्ट्यांसंदर्भात पोलिसांना माहिती सुद्घा मिळाली आहे. विशेष म्हणजे ड्रग्स पेडलर्संनी इंटरनेटवर अंमली पदार्थांना कोड सुद्धा दिल आहेत.पोलीस या कोडवर्ड्सना ब्रेक करण्यात लागली आहे. सगळ्यात महागडा डग्स एक्सटसीला कतरीना, चरसला बिपाशा, तर गांजाला राखी सावंत नाव देण्यात आलं आहे.