www.24taas.com, मुंबई
पेट्रोलच्या दरवाढीविरोधात एनडीएनं उद्या पुकारलेल्या बंदबाबत मुंबईत संभ्रमाचं वातावरण आहे. मुंबईत उद्या काय होणार याची चर्चा सगळीकडे सुरु असली तरी कार्यालयांना सुट्टी द्यायची की नाही याचा संभ्रम आज दिवसभर सगळीकडे होता.
शिवसेना-भाजप आणि रिपाइंनं बंदची जोरदार तयारी केली असली तरी रेल्वे, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी उद्या सुरु राहणार असल्याचं रेल्वे-बेस्ट प्रशासन आणि रिक्षा-टँक्सी युनियन्सनी जाहीर केलंय. अर्थात शिवसेना-भाजप प्रणित युनियनचा या बंदला पाठिंबा आहे. त्यामुळे बंदचा जनजीवनावर किती परिणाम होईल याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. विशेषतः रेल्वे आणि बसेस टार्गेट होण्याची शक्यता आहे.
दुकानं बंद राहतील अशी चिन्हं आहेत. तर पेट्रोल पंप उद्या बंद राहणार आहेत. त्यांचा बंदला पाठिंबा नसला तरी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय युनियननं घेतलाय. एकूणच उद्या सकाळीच बंदचं चित्र स्पष्ट होईल.