सुप्रिया सुळे 'मातोश्री'वर....

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने महाराष्ट्रातील नेते एकत्र झाल्याचे दिसून आले. कारण की, या हल्ल्याचा तीव्र निषेध साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हल्ल्याविरूद्ध एल्गार करीत मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली आहे.

Updated: Nov 27, 2011, 01:49 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने महाराष्ट्रातील नेते एकत्र झाल्याचे दिसून आले. कारण की, या हल्ल्याचा तीव्र निषेध साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या हल्ल्याविरूद्ध एल्गार करीत मराठी माणसाला पुन्हा एकदा साद घातली आहे.

मराठी माणसाला झालेल्या मारहाणीला योग्य त्या शब्दांत उत्तर दिलं जाईल. असा इशाराच बाळासाहेबांनी दिला. यासाठीच खुद्द बाळासाहेब यांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवर जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच राजकारण्यांनीही पक्षभेद विसरून या घटनेचा निषेध केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही पवारांवरचा भ्याड हल्ला घृणास्पद असल्याचं सांगत निषेध व्यक्त केला होता. शिवसेनाप्रमुखांनी हल्ल्याचा निषेध केल्यानं त्याबाबत पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी बाळासाहेबांचे आभार मानले. याबाबत त्यांनी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.