ATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री

शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे. 

Updated: Nov 1, 2014, 10:05 AM IST
ATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री title=

मुंबई: शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे. 

या माध्यमातून ग्राहक आपल्या खात्याच्या एटीएममधून केवळ पाचवेळा मोफत पैसे काढू शकणार आहे. तर इतर बँकांमधून तीन वेळा मोफत पैसे काढू शकणार आहे. आरबीआयने गेल्या ऑगस्ट महिन्यात हे दिशा-निर्देश जाहीर केले होते. 

नव्या नियमानुसार दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून तीन वेळेपेक्षा अधिक वेळेस पैसे काढल्यास प्रत्येक वेळी २० रूपये द्यावे लागणार आहे. यापूर्वी ग्राहकांना क्रॉस बँकेचे एटीएम वापरल्यास पाच वेळा मोफत पैसे काढू शकत होते. 

तसेच आता हाच नियम आपल्या स्वतःच्या बँकेबाबतही लागू होणार आहे. त्यानुसार पाच व्यवहार मोफत असतील आणि त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये शुल्क लागणार आहे. 

आरबीआयचे हे दिशा-निर्देश सहा मेट्रोपॉलिटन शहरात म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकता आणि हैदराबादमध्ये शनिवारपासून लागू होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.