मुंबई : गुढीपाडवा. सण चैतन्याचा, नव्या उमेदीचा आणि शुभारंभाचा. झी चोवीस तास वेब टीमतर्फे सर्व प्रेक्षकांना मराठी हिंदू नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येपासूनच राज्यभरात उत्सवाचा जल्लोष दिसून आला.
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजे हिंदू वर्षातला पहिला दिवस. भारतीय शालिवाहन शक या कालगणनेचं हे १९३७ वं वर्ष. वर्षाचा हा पहिला दिवस गुढीपाडवा रुपात महाराष्ट्रात साजरा केला जातो. हे नवं वर्ष तुम्हा सर्वांकरता सुखाचं, यशाचं, समृद्धीचं राहो, या शुभेच्छा.
नववर्षाच्या शुभेच्छांचा अमृतकुंभ देववाणीमधून फक्त झी 24 तासवर. भाषा जगवण्यासाठी झी 24 तासचा अभिनव उपक्रम. भाषा वाचवण्यासाठी झी 24 तासने सातत्याने प्रयत्न केले. जवळपास 50 बोलीभाषांमधून आम्ही बातमीपत्रे प्रसारित केलीत. भाषातज्ज्ञ डॉ. गणेशदेवी यांनी संस्कृत भाषेचे महत्व विषद केले. सर्व भाषांची मूळ भाषा असलेल्या संस्कृतमधून, नवे बातमीपत्र सुरु करत आहोत. नववर्षाच्या शुभारंभाला, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर.
नववर्षाच्या निमित्तानं नाशिकमध्ये पहाट पाडवा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. किराणा आग्रा घराण्याच्या गायिका शैला दातार यांच्या गायनाचा आस्वाद नाशिककर घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.