दहावी निकालाची तारीख शनिवारी जाहीर होण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून उद्या शनिवारी (६ जून) तारीख जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.

Updated: Jun 5, 2015, 01:46 PM IST
दहावी निकालाची तारीख शनिवारी जाहीर होण्याची शक्यता title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असून उद्या शनिवारी (६ जून) तारीख जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.

बारावीचा निकाल लागल्यानंतर साधारण १५ ते २० दिवसानंतर दहावीचा निकाल लागलो. मात्र, दहावीचा निकाल लागण्यास उशीर झालाय. मात्र, ६ जून २०१५ रोजी दहावी परीक्षा निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील नऊ मंडळाच्या निकालाची तारीख उद्या घोषित होण्याची शक्यता आहे. यात पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर आदी मंडळांचा समावेश आहे.

दहावीचा निकाल सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते. मात्र, राज्य माध्यमिक मंडळाने याबाबत अधिकृत तसे जाहीर केलेले नाही.

निकाल पाहण्यासाठी

> mahresult.nic.in

> mahahsscboard.maharashtra.gov.in 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.