www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईला दहशवादी पुन्हा एकदा टार्गेट करू शकतात. तसा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. एखादी हवाई सफर करावयाची असेल तर पोलिसांनी परवानगी घेण्याची आवश्यता आहे. तशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दहशतवादी पुन्हा मुंबईला टार्गेट करु शकतात. यावेळी, एअरक्राफ्ट म्हणजे हवाई मार्गे मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पॅराग्लायडिंग, पॅरामॅनिटरिंग, पॅरासेलिंग, मायक्रोलाईट या हवाई मार्गानंही मुंबईवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो.
गुप्तचर विभागानं ही माहिती मुंबई पोलिसांना दिलीय. या पत्रकरानुसार एअरक्राफ्ट, पॅराग्लाइंडिंग, पॅरामॉनिटरिंग, पॅरासेलिंग, मायक्रोलाईटद्वारे मुंबईहून हवाई सफ़र करण्याआधी मुंबई पोलीस आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.