www.24taas.com, मुंबई
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक बॉम्बगोळा टाकलाय. पुण्यातील हेक्सवर्ल्ड प्रकल्पात भुजबळांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पात 40 फ्लॅट दिल्याचंही सोमय्या यांनी सांगितलय. फ्लॅट मिळवलेल्या अधिका-यांची नाव येत्या 15 ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलयं. त्यामुळं हे लाभार्थी अधिकारी कोण आहेत याची उत्सुकता निर्माण झालीये.
कालच सोमय्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले होते. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला होता. सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय. तसंच या घोटाळ्याची चौकशी होऊ नये यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये सेटिंग असल्याचाही आरोप सोमय्यांनी केला होता.
रामराजे निंबाळकर, छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनाही त्यांनी लक्ष्य केलय. कृष्णा खोरे घोटाळ्याला रामराजे निंबाळकर जबाबदार असल्याचा आरोप करताना, यात छगन भुजबळांनाही फायदा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. नवी मुंबईत भुजबळांना 100 एकर जमीन मिळाल्याचंही त्यांचं म्हणणं होतं. यापूर्वी महाराष्ट्र सदन प्रकरणातही भुजबळांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या संदर्भातील सर्व पुरावेही सोमय्यांकडे असल्याचा दावा त्यांनी केलाय.