पंतप्रधान कार्यक्रम उपस्थितीसाठी केवळ प्रोटोकॉल पाळा - काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबरच्या उदघाटन कार्यक्रमांना काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहावे. मात्र त्यानंतर राजकीय रॅलीला जाऊ नये,अशी सूचना काँग्रेसने आपल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलीय. पुणे असो की नागपूर, मेट्रो प्रकल्पाचं श्रेय्य काँग्रेस सरकारचंच आहे. मोदी सरकार हे श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावलाय.

Updated: Aug 20, 2014, 05:39 PM IST
पंतप्रधान कार्यक्रम उपस्थितीसाठी केवळ प्रोटोकॉल पाळा - काँग्रेस title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीबरोबरच्या उदघाटन कार्यक्रमांना काँग्रेसशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांनी प्रोटोकॉल म्हणून उपस्थित राहावे. मात्र त्यानंतर राजकीय रॅलीला जाऊ नये,अशी सूचना काँग्रेसने आपल्या पक्षातील मुख्यमंत्र्यांना दिलीय. 

पुणे असो की नागपूर, मेट्रो प्रकल्पाचं श्रेय्य काँग्रेस सरकारचंच आहे. मोदी सरकार हे श्रेय्य लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावलाय.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमास राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहावं मात्र त्यामध्ये राज्याचा अपमान होऊ नये, ही अपेक्षा असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलंय. तसंच पंतप्रधान उपस्थित राहणार असलेल्या नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहावं की नाही याबाबत कुठलाही आदेश किंवा सूचना मिळालेली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र, हरयाणा राज्यात अनेक विकास कामाच्या उदघाटानासाठी जात आहेत.. सोलापूर आणि त्यानंतर हरयाणा इथं या कार्यक्रमानंतर झालेल्या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांना मोदी-मोदीचा जयघोष ऐकावा लागला त्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री हुड्डांनी नाराजी व्यक्त करत आपण अशा कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका घेतली.

त्यानंतर काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना प्रोटोकॉल म्हणून कार्यक्रमात उपस्थित राहावे पण रॅली टाळावी अशी सूचना दिली. त्यामुळं नागपूर मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार असले तरी त्यानंतर जर रॅली झाली तर त्यासाठी सीएम जाणार की नाही जाणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.