मुंबई : शिवसेनेने नीट बजेट वाचला नाही, किंवा ऐकला नसेल. नीट वाचल्यावर त्यांना कळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने रेल्वे बजेटवर केलेल्या टिकेवर दिले आहे.
रेल्वे बजेट आहे पॉप्युलिस्ट नसून प्रॅक्टिकल असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, ख-या अर्थाने समस्या जाणून घेतल्या, त्याची उत्तर अर्थसंकल्पात आहेत.
गेल्या अनेक वर्षातला अतिशय उत्तम रेल्वे अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील कनेक्टीव्हिटी करता पैसा उपलब्ध होणार आहे, अर्धवट मार्ग पूर्ण होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राकरता खुशखबर घेऊन येणार अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुंबईत MUTP 2 पूर्ण होत असतांना MUTP 3 ला मान्यता दिली आहे. आधीच्या प्रकल्प पूर्ण होण्याची वाट बघितली तर we will मिस the bus असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील रेल्वेसाठी निधी आराखडा अर्थसंकल्पात सांगितला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.