www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळं सगळ्याच्याच डोळ्यातुन पाणी येत आहे. यातुन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा मिळावा म्हणुन कोल्हापूर जिल्ह्यात ना नफा ना तोटा या तत्वावर रेशनमधुन कांदा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उद्यापासून सुरु होणा-या या उपक्रमामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळणार आहे.
गगनाला भिडलेल्या कांद्याच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जेवणामध्ये कांदा वापरणं बंद केलंय. सर्वसामान्यांच्या याच त्रासाचा विचार करत कोल्हापूरात कांदा व्यापारी असोसिएशन, क-षी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारांनी ना नफा ना तोटा तत्वावर कांदा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कोल्हापुरकरांना आता रेशनमधून कांदा मिळणार आहे.
या उपक्रमाचा फायदा केसरी कार्डधारकांना मिळणार नाही याचाच विचार करुन कोल्हापूरातल्या अनंतराव गोविंदराव कोरंगांवकर सामाजीक ट्रस्टनं शंभर रुपयाला तीन किलो कांदा आजपासुन उपलब्ध करुन दिलाय.सर्वसामान्यांना स्वस्त दरात कांदा देणा-या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय.
एकीकडं महागाईन सर्वसामन्य नागरीकाचं कंबरडं मोडलं आहे,त्यात काद्याच्या दरामुळं त्यांच्या संकटात आणखी भर पडली होती. पण रेशनवर कांदा पुरवण्याच्या या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय हे निश्चित
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.