२१ वर्षांची ही महिला मल्ल, लोळवते पुरूष मल्लांना

ही बातमी तुम्हांला बॉलिवूड चित्रपटातील वाटेल किंवा WWEच्या बॉक्सिंग रिंगमधील वाटेल पण ही बातमी खरी आहे.

Updated: Jan 12, 2016, 09:30 PM IST
२१ वर्षांची ही महिला मल्ल, लोळवते पुरूष मल्लांना title=

भोपाळ : ही बातमी तुम्हांला बॉलिवूड चित्रपटातील वाटेल किंवा WWEच्या बॉक्सिंग रिंगमधील वाटेल पण ही बातमी खरी आहे.

महू येथे २१ वर्षीय तरूण महिला पहेलवान पुरूष पहेलवानांना चॅलेंज करते आणि काही मिनिटातच चितपट करते.

राणी राणा असे या महिला मल्लाचे नाव आहे. ती ग्वालेरची आहे. तीने आपल्या पुरूष प्रतिस्पर्धीला काही मिनिटात चित केले. कोडारिया येथील सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात सुरू असलेल्या राणीने हा कारनामा केला आहे.

राणी राणाने ४५ किलो वजनी गटात चित्रा यादवला नमवले. त्यानंतर तीने रिंगमध्ये उतरून पुरूष मल्लांना ओपन चॅलेंज दिले. त्यावेळी विनोद प्रजापती रिंगमध्ये उतरला पण तिने त्याला काही क्षणात चितपट केले.

यानंतर हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राणी राणा म्हणाली, पुरूष मल्लाला नमवणे काही विशेष गोष्ट नाही.