www.24taas.com, झी मीडिया
भारतीय प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ आरोग्यास्वामी यांनी 4 जी आणि `वाय-फाय`सेवेचं आरोग्य सुधारलंय, तसेच प्राध्यापक आरोग्यास्वामी जोसेफ पॉलराज यांना २०१४ चा मारकोनी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मारकोनी हा पुरस्कार तंत्रज्ञानातला नोबेल
मारकोनी हा पुरस्कार तंत्रज्ञानातला नोबेल समजला जातो. या पुरस्काराची ओळख `टेक्नॉलॉजी नोबेल` अशी आहे.
आरोग्यास्वामी मूळचे भारतीय
आरोग्यास्वामी हे अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिवर्सिटीत शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहेत. आरोग्यास्वामी मूळचे भारतीय आहेत. त्यांचा जन्म तामिळनाडूच्या कोयम्बतूरमध्ये झालाय.
पुरस्कार देणाऱ्या मारकोनी सोसायटीच्या मते, सिग्नल रिसिव्हर आणि ट्रान्समिशन करण्यासाठी, एक जादा ऍण्टीना वापरण्याची थेअरी ही प्रोफेसर पॉलराज यांची आहे. ही आधुनिक थेअरी हाय स्पीड वाय-फाय आणि 4 जी तंत्रज्ञानाचा आत्मा आहे.
पॉलराज यांच्या (MIMO) मीमो टेक्नॉलॉजीचा वापर
वायरलेस तंत्रज्ञानमध्ये प्रोफेसर पॉलराज यांचं मोठं योगदान आहे, प्रत्येक वायफाय राउटर आणि 4 जी फोनमध्ये पॉलराज यांच्या (MIMO) मीमो टेक्नॉलॉजीचा वापर होतो. यामुळे इंटरनेट युझर्सना याचा प्रचंड प्रमाणात फायदा झाला आहे. प्रोफेसर पॉलराज यांच्या संशोधनामुळे हजारो संशोधनांना योग्य दिशा मिळणार आहे.
माझा यातला वाटा फार कमी
मीमो तंत्रज्ञानाचा वापर वायफाय आणि ४ जी सेवेत होत असला, तरी जगभरातील हजारो रिसर्चर आणि अभियंत्यांचा यात मोलाचा वाटा आहे. त्याच्या या मदतीशिवाय माझा यातला वाटा फार कमी आहे, असं प्राध्यापक पॉलराज यांनी म्हटलं आहे.
पॉलराज होते इंडियन आर्मी
पॉलराज यांनी इंडियन आर्मीच्या इलेक्ट्रीकल इंजीनिअरिंगमध्येही काही काळ काम केलंय. पॉलराज सुरूवातीपासूनच एक चांगले विद्यार्थी होते, त्यांनी १५ वर्ष वयातच आपलं शिक्षणपूर्ण केलं होतं. आर्मीतल्या हत्यारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम त्यांच्याकडे होतं.
आर्मीच काम सोडून त्यांनी नियंत्रण तंत्रज्ञान, संचार आणि सिग्नल सिस्टीमच्या बाबतीत पुढील शिक्षण घेतलं, आणि त्यानंतर केलेला अभ्यास हा वायफाय आणि 4 तंत्रज्ञानासाठी मैलाचा दगड ठरला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.