वायफायची जागा घेणार लायफाय

वायफायपेक्षा 100 पट अधिक जलदपणे चालणारी आधुनिक कनेक्टिव्हिटीचं तंत्रज्ञान लायफाय लवकरच येणार आहे. जो वाईफायची जागा घेऊ शकतो.

Updated: Nov 25, 2015, 08:58 PM IST
वायफायची जागा घेणार लायफाय title=

मुंबई : वायफायपेक्षा 100 पट अधिक जलदपणे चालणारी आधुनिक कनेक्टिव्हिटीचं तंत्रज्ञान लायफाय लवकरच येणार आहे. जो वाईफायची जागा घेऊ शकतो.

या तंत्रज्ञानाचा परीक्षण करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी व्हिजिबल लाईट कम्युनिकेशनचा वापर केला गेला. ज्यामुळे कनेक्टिव्हिटीची गती 1 जीबीपीस नोंदवली गेली जी वायफाय पेक्षा 100 पट अधिक आहे.

मागील 2 वर्षांपासून या तंत्रज्ञानावर वैज्ञानिक काम करत होते. या तंत्रज्ञानाचा परीक्षण केंद्राबाहेरही वापर केला गेला, तेव्हा त्याची कनेक्टिव्हिटी 1 जीबीपीस नोंदवली गेली. सामान्य वायफाय राऊटर्समध्ये कनेक्टिव्हिटीची गती 100 एमबीपीएस असते.

कनेक्टिव्हिटी स्पीड म्हणजे इंटरनेट स्पीड नसतो. कनेक्टिव्हिटी स्पीड म्हणजे 2 डिवाईसला जोडण्याचा स्पीड असतो. इंटरनेटची स्पीड हा इंटरनेट प्रोव्हाईडरवर अवलंबून असते.

लायफायचा फायदा हा कार्यालय आणि लोकल नेटव्हर्किगमध्ये होणार आहे. लायफाय ही देखील वायफायप्रमाणे वायरलेस डेटा ट्रॅव्हल करणारं तंत्रज्ञान आहे.

लायफायमुळे सुरक्षित नेटवर्क ठेवण्यासाठीही मदत होणार आहे. वायफायचे सिग्नल भिंती पलिकडे जातात त्यामुळे त्यांची कनेक्टीव्हिटी कमी होते. पण नव्या लायफायचे सिग्नल भिंतींच्या पलीकडे  जाऊ शकत नसल्याने त्याला 224 जीबीपीएस इतकी जबरदस्त गती मिळू शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.