www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
नोकिया कंपनीने नोकिया x, नोकिया x+ आणि नोकिया xL हे आपले पहिले अँड्रॉईड फोन लॉन्च केले आहेत.
बार्सिलोनामध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2014 सुरू आहे, यात नोकियाने हे तीन फोन लॉन्च केले.
या निमित्तानं मोबाईल कंपनी नोकियाने अखेर अँड्रॉईड फोनच्या दुनियेत पदार्पण केलं.
भारतीय बाजारात नोकिया x ची किंमत 7 हजार 560, तसेच नोकिया x+ ची किंमत 8 हजार 400 रुपये आहे. आणि नोकिया xL हा 9 हजार 200 रुपयांना आहे
नोकियाचे हे तीनही फोन, बजेट स्मार्टफोन आहेत.
यॉन्डेक्स स्टोअरवरुन या दोन्ही फोनमध्ये अँड्रॉईड अॅप्स डाऊनलोड करता येऊ शकतात.पण नोकिया एक्स आणि एक्स प्लसमध्ये गूगल प्ले स्टोअर इन्स्टॉल नाही.
या तीनही फोनमध्ये बीबीएमचा आधीच समावेश करण्यात आलाय. नोकिया एक्समध्ये 512 MB रॅम असून, एक्स प्लस आणि एक्स एलचा रॅम 768 MB आहे.
नोकिया x आणि नोकिया x+ मध्ये 800x480 मेगापिक्सेलची 4 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे.
या तीनही फोनमध्ये क्वालकोम स्नॅपड्रॅगन ड्युएल कोर प्रोसेसर आहे, तसेच हे ड्युएल सिम फोन आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.