www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`नोकिया फिट` या नव्या युक्तीनं सध्या बाजारातील अनेक टेक सॅव्हींचं लक्ष आपल्याकडे वळवलंय. `नोकिया` या मोबाईल कंपनीचा `नोकिया रिंग` नावाचा एक नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
एखाद्या अंगठीप्रमाणे दिसणारा हा स्मार्टफोन यूजर्सला खूप फायदेशीर ठरू शकतो. हा स्मार्टफोन केवळ एका बोटात घालून यूजर्स नोटिफिकेशन, इनकमिंग कॉल, मॅसेजेस, लाईक करू शकतात. `इस्साम ट्रॅबेल्सी`नं नोकिया फिटचा हा नवा स्मार्टफोन डिझाईन केलाय.
पाहुयात नोकिया फिटची काही वैशिष्ट्यं...
* नोकिया रिंग सॉफ्ट सिलिकॉन फ्लेक्सिबल रबरची बनविलेली आहे.
* यामध्ये कॉलिंग फिचरशिवाय फिटनेस ट्रॅकरसहीत आणखीन काही आधुनिक फिचर्स उपलब्ध आहेत.
* नोकिया फिट कन्सेप्टमध्ये केवळ आपल्या एका बोटात हा स्मार्टफोन एखाद्या अंगठीप्रमाणे घालून तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता.
* तुम्ही कोणत्याही बोटात हा स्मार्टफोन सहज घालू शकता.
* `नोकिया रिंग` पूर्णत: वॉटरप्रूफ आहे.
* `नोकिया रिंग`वर धूळ आणि मातीचा कोणताही परिणाम होणार नाही.
`विअरेबल गॅझेटस्` म्हणजे अशी गॅझेटस् जे तुम्ही परिधान करू शकता, अशांसाठी नुकतंच गुगलनं अँन्ड्रॉईड विअर नावाचं एक नवीन ऑपरेटींग सिस्टम लॉन्च केलंय. यामध्ये गुगल नॉओशिवाय इतरही काही अँन्ड्रॉईड फिचर दिले गेलेत. `मोटोरोला` या कंपनीनंही ३६० नावानं नवीन स्मार्टवॉच लॉन्च केलाय. त्यामुळे, सध्या `विअरेबल गॅझेटस्`ची चलती आहे, असं म्हणायला हरकत नाही.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.