www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
महिलांनो कॉस्मेटिक उत्पादने वापरत असाल तर सावधान बाळगा. कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये जीवघेणे घटक वापरले जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. तर काही घटक धोकादायक ठरल्याने कर्करोगाला आमंत्रण देण्याचे काम करीत आहेत.
भारतात कॉस्मेटिक उत्पादनात पार्याच्या वापरावर बंदी असताना अनेक कंपन्या याचे उल्लंघन करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ मांडत आहेत. विज्ञान आणि पर्यावरण केंद्राच्या प्रदूषण नियंत्रक प्रयोगशाळेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सध्या बाजारामध्ये अनेक कंपनींची कॉस्मेटिक उत्पादने आली आहेत. या कॉस्मेटिक उत्पादनात पार्यासारखा अत्यंत घातक घटक वापरला गेला आहे. तसेच कर्करोगाला आमंत्रण देणारा क्रोमियमचाही लिपस्टिकमध्ये वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वेक्षणात ४४ टक्के फेअरनेस क्रीममध्ये पारा आढळूलाय. तर ४३ टक्के लिपस्टिकमध्ये निकेल आणि ५० टक्के लिपस्टिकमध्ये क्रोमियम घटकाचा वापर केला जात असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे तुम्ही कॉस्मेटीकचा वापर करत असाल तर काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.