सर्दी आणि खोकला यावर 10 घरगुती सोपे उपाय

Oct 20, 2018, 11:24 AM IST
1/10

१. अदरक चहा : अदरक चहामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर सामान्य सर्दी आणि खोकला देखील बरा होण्यास मदत होते. अदरक चहामुळे नाकातून पाणी येणे आणि नाक बंद होणे  यापासून दिलासा मिळतो. शिवाय श्वसनमार्गातून घाण देखील बाहेर पडते.

2/10

२. लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण: सामान्य सर्दी आणि खोकलासाठी आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे लिंबू, दालचिनी आणि मध यांचे मिश्रण. हे सिरप प्रभावीपणे सर्दी आणि खोकला बरे करते.

3/10

३. कोमट पाणी : वारंवार कोमट पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला यांच्या विरुद्ध लढण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने गळ्याभोवतीची सूज देखील कमी होते. 

4/10

४. दूध आणि हळदी : सर्व भारतीय स्वयंपाकघरात सापडणारा एक आवश्यक घटक म्हणजे हळदी. हळदी एक अँटिऑक्सीडेंट आहे ज्यामुळे आरोग्याला बरेच फायदे होतात. झोपण्याच्या आधी एक ग्लास गरम हळद दूध प्यायल्याने सर्दी आणि खोकला बरा होतो.

5/10

५. मीठाच्या पाण्याने गुळण्या : हा अतिशय जुना औषधोपचार आहे .जो खोकला आणि सर्दी प्रभावीपणे हाताळतो. या खारट पाण्यात हळद घालणे देखील फायदेशीर आहे.

6/10

६. मसाल्याचा चहा : आपल्या चहामध्ये तुळस, आले आणि काळी मिरपूड घालून चहा बनवा. या मसाल्याच्या चहामुळे खोकला आणि सर्दी बरी होते.

7/10

७. आवळा : आवळ्यामध्ये मजबूत रोगप्रतिकारक क्षमता असल्याने तो बऱ्याच आजारांविरोधात लढतो. यकृतचं कार्य सुरळीत करण्यासाठी आणि रक्त भिसरण सुरळीत करण्यासाठी आवळा मदत करतो.

8/10

८. अद्रक आणि तुळसीचे मिश्रण : अदरकचा रस काढून त्यावर तुळशीची पाणे घाला. त्यानंतर त्यात मध घालून ते मिश्रण घेतल्याने खोकल्यापासून आराम मिळतो.

9/10

९. अदरक आणि मीठ : अदरकचे लहान तुकडे करून त्यात मीठ घालावे. यामुळे सर्दी, खोकला आणि गळ्याचं दुखणं कमी होतं.

10/10

१०. गाजर रस : सामान्य सर्दी आणि खोकला असेल तर त्यावर घरगुती उपाय उत्तम आहे. गाजरचा रस प्यायल्याने सामान्य सर्दी आणि खोकला बरा होण्यास मदत होते.