टायटॅनिक जहाज बुडून उलटली 112 वर्ष; आजही न उलगडलेली रहस्य

112 वर्षांपूर्वी बुडालेल्या या टायटॅनिक जहाजाला पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. 18 जूनपासून या पाणबुडीचा संपर्क झालेला नाही. मध्य अटलांटिक महासागरामध्ये या पाणबुडीची शोधमोहिम सुरु आहे.  112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमधी मिळाली. टायटॅनिक जहाजाबद्दल अशी काही रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत.  जाणून घेऊयात ही न उलगडलेली रहस्य.

Jun 21, 2023, 23:24 PM IST

Titanic Tourist Submersible: 112 वर्षांपूर्वी बुडालेल्या या टायटॅनिक जहाजाला पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. 18 जूनपासून या पाणबुडीचा संपर्क झालेला नाही. मध्य अटलांटिक महासागरामध्ये या पाणबुडीची शोधमोहिम सुरु आहे.  112 वर्षांपूर्वी टायटॅनिक जहाजाला जलसमधी मिळाली. टायटॅनिक जहाजाबद्दल अशी काही रहस्य आहेत जी आजही उलगडलेली नाहीत.  जाणून घेऊयात ही न उलगडलेली रहस्य.

1/10

टायटन ही पाणबुडी दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे.  अटलांटिक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाची पाहणी करायला ही पानबुडी गेली होती. या पाणबुडीत पाकिस्तानमधील अब्जाधीश पिता-पुत्र आणि ब्रिटनमधील एक उद्योजक यांच्यासह एकूण पाच जण होते.

2/10

टायटॅनिक दुर्घटनेत सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला. लाईफ बोट नसल्यामुळे मृतांचा आकडा वाढला. 

3/10

टायटॅनिकची लांबी 269 मीटर होती. क्रू मेंबरसह 3300 लोकांना राहण्याची सोय या जहाजावर होती. आजचे सर्वात मोठे प्रवासी जहाज वंडर ऑफ द सी आहे, जे 362 मीटर लांब असून या जहाजावर 2300 क्रू मेंबर्ससह सात हजार प्रवासी प्रवास करू शकतात.

4/10

टायटॅनिकने 10 एप्रिल 1912 रोजी आपला पहिला प्रवास सुरू केला. 14 ते 15 एप्रिल दरम्यान या जहाजाला जलसमाधी मिळाली. 

5/10

टायटॅनिक जहाजाच्या कॅप्टनला वाटेत येणाऱ्या हिमखंडांची क्लपना होती. तरी देखील त्याने जहाजाचा वेग कमी केला नाही. 

6/10

टायटॅनिक बनवण्यासाठी सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. टायटॅनिक जहाजाला ब्लू बँडदेखील मिळाला होता.

7/10

टायटॅनिक जहाज मोठ्या हिमनगाला धडकल्यामुळे जहाजाला छिद्र पडून जहाज बुडाले.   

8/10

टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर सप्टेंबर 1985 मध्ये अपघातस्थळावरून अवशेष काढण्यात आले.  दुर्घटनेनंतर  कॅनडापासून 650 किलोमीटर अंतरावर 3,843 मीटर खोलीवर जहाजाचे दोन भाग झाले आणि दोन्ही भाग एकमेकांपासून 800 मीटर दूर होते.

9/10

टायटॅनिक जहाज बुडाल्यानंतर 1500 लोकांना जलसमाधी मिळाली.  आजपर्यंतची ही सर्वात मोठी जहाज दुर्घटना आहे.  

10/10

14 आणि 15 एप्रिल 1912 च्या मध्यरात्री टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडाले. अपघाताच्या वेळी टायटॅनिक इंग्लंडमधील साउथॅम्प्टनहून अमेरिकेतील न्यूयॉर्ककडे 41 किलोमीटर प्रतितास वेगाने जात होते.