धक्कादायक! गेल्या 24 तासांत 4 कलाकारांनी कोरोनामुळे गमावला जीव

May 06, 2021, 17:08 PM IST
1/5

सिनेजगतातून चार दुःखद घटना

सिनेजगतातून चार दुःखद घटना

कोरोना काळ बनून आला. गेल्या काही दिवसांत सिने जगतातून अनेक दुःखद घटना समोर आल्या. या काळात काही कलाकारांनी आपल्या भावाला गमावलं तर काहींनी आपल्या पालकांना. गेल्या 24 तासांत 4 कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साऊ सिनेम जगतात पांडू, श्रीप्रदा आणि मराठी सिनेसृष्टीतून अभिलाषा पाटील तर अजय फिल्म एडिटर यांचं निधन झालं आहे 

2/5

पांडु

पांडु

साउथ सिनेमाचे कलाकार पांडु (Pandu) यांचं 74 व्या वर्षी कोरोनाने निधन झालं आहे. अभिनेता मानोबालाने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. साऊथ सिनेमात अभिनेत्याच्या निधनाने शोककळा पसरली.

3/5

श्रीप्रदा

श्रीप्रदा

सिने एंड टीवी आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) च्या जनरल सेक्रेटरी अमित बहल यांनी श्रीप्रदा (Shripadha)यांच्या निधनाची माहिती दिली. बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडमुळे त्यांचं निधन झालं. श्रीप्रदा यांनी विनोद खन्ना, गुलशन ग्रोवर, गोविंद सह अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे.

4/5

अभिलाषा पाटिल

अभिलाषा पाटिल

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) चा सिनेमा `छ‍िछोरे` (Chhichhore) ची को-स्टार अभिलाषा पाटिल (Abhilasha Patil) चं कोरोनाने निधन झालं. अभिलाषा पाटिल (Abhilasha Patil) वाराणसी मध्ये आपल्या आगामी सिनेमासाठी शुटिंग करत होती. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाली. वाराणसीतीस शूट सोडून मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचं निधन झालं. 

5/5

अजय शर्मा

अजय शर्मा

सिनेमा एडिटर अजय शर्मा (Ajay Sharma)  यांचं देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झालं. नवी दिल्लीच्या रूग्णालयात अजय यांच्यावर उपचार सुरू होता. अजय यांनी  `लूडो`, `जग्गा जासूस`, `बर्फी`, `काई पो छे`, `ये जवानी है दीवानी` सारख्या सिनेमांचं एडिट केलं आहे.