PHOTO : 40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचा कमोड... सामान्यांनाही पाहता येणार जगनमोहन रेड्डी यांचं 500 कोटींचं 'हिल पॅलेस'

Jagan Mohan Reddy Vishakhapatnam Luxurious Hill Palace : विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर आलिशान राजवाड्यामुळे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी वादात सापडलेत. जगन यांचं आलिशान राजवाडा बांधल्याचा आरोप सत्ताधारी टीडीपीने केलाय.   मात्र ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि ती सरकारी कामांसाठी वापरण्यात यावी, असं स्पष्टीकरण जगन रेड्डी यांच्या पक्षाने स्पष्टीकरण दिलंय. 

Jun 19, 2024, 16:05 PM IST
1/7

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशच्या राजकारणात हिल पॅलेस चर्चेत आलंय. 

2/7

टीडीपीने असा आरोप केलाय की, जगनने विशाखापट्टणममधील रुशीकोंडा टेकडीवर 500 कोटी रुपयांचे हे आलिशान राजवाडा मोठे बॅरिकेड्स लावून ते लपविण्याचा प्रयत्न केला होता.   

3/7

रेड्डी यांनी लक्झरी सुविधांवर सुमारे 500 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यात सर्वाधिक खर्च हा 40 लाख रुपये किमतीचा बाथटब  केलाय. तर 10 ते 12 लाख रुपयांच्या कमोडवर खर्च झाला आहे. 

4/7

महलामध्ये आलिशान फर्निचरसह सुसज्ज स्पा रूम आणि अगदी उच्च दर्जाचे मसाज टेबलदेखील पाहिला मिळते. आंध्र प्रदेश 12 लाख कोटी रुपयांच्या कर्जात बुडाला असताना या बांधकामांचे कंत्राट जगन मोहन रेड्डी यांचे नातेवाईक देवी रेड्डी श्रीनाथ रेड्डी यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

5/7

विशाखापट्टणममधील आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचं हे आलिशान महाल सर्वसामान्यांना पाहता येणार आहे. हे महाल पाहून नेत्यांसह जनता हैराण झाली आहे.   

6/7

रुशीकोंडा पॅलेस समुद्रासमोर 9.88 एकरमध्ये पसरलेला असून यात 7 आलिशान इमारतींपैकी 3 मुख्यतः निवासी इमारती आहेत. यामध्ये 12 बेडरूम असून प्रत्येक बेडरूममध्ये लग्झरी वॉशरूमची व्यवस्था आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या लक्झरी सुविधा, उच्च दर्जाचे फर्निचर, फर्निशिंग, चमकणारे झुंबर, बाथटब आणि फरशीच्या कामावर जनतेचा पैसा वापरला गेला आहे. 

7/7

या महलातील आतील सजावटीसाठी लागलेल्या साहित्य आणि फर्निचरसाठी सुमारे 33 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय. त्याचबरोबर रस्ते, कालवे आणि उद्यानांच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च झाला आहे. इमारतीच्या बाहेरही अप्रतिम लँडस्केपिंग आणि उद्यानात 2 ते 3 प्रकारचे पदपथ तयार करण्यात आले आहेत.