Skin Care Tips: तुम्हालाही हवीये चाळीशीनंतर चमकदार त्वचा? 'या' पाच गोष्टींचा आहारात करा समावेश

Healthy skin Tips: चाळीशीनंतर त्वचेत बदलाव होऊ लागतो. त्वचेची लवचिकता कमी होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. पण योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे तुम्ही चमकणारी, तजेलदार त्वचा मिळवू शकतात.

Aug 16, 2024, 19:57 PM IST

skin Tips: रोजच्या आहारात असे काही पदार्थ समाविष्ट केल्यास तु्म्हीही मिळवू शकता तुमच्या आवडत्या अभिनेत्रीसारखी त्वचा.

1/5

बदाम

बदाममध्ये एंटीऑक्सिडेंट्स आणि विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण होते. रोज बदाम खाल्याने तुमच्या त्वचेचे आतून पोषण होऊन त्वचा हाइड्रेटेड राहते.

2/5

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त आहे. ज्यामुळे कोलेजन तयार होण्यास मदत होते. कोलेजनमुळे लवचिकता टिकून राहते. त्याने त्वचा तरूण आणि टवटवीत राहते. 

3/5

फैटी फिश

साल्मन आणि टूना या माशांपासून मोठ्याप्रमाणात फैटी एसिड्स मिळते. हे फैटी एसिड्स त्वचेची सूज कमी करते, त्वचेतील नैसर्गिक तेलाचे संतुलन राखते. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होऊन सुरकुत्या कमी होतात. 

4/5

पालक

पालकामध्ये मिळणारे विटामिन ए त्वचेतील सेल्स वाढवते, विटामिन सी कोलेजनच्या निर्मितीला मदत करते. यासोबतच विटामिन के, आयरन आणि फोलेटसारखे तत्व यातून मिळतात.

5/5

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे एंटीऑक्सिडेंट असते. ज्याने यूवी किरणांपासून त्वचेचे संरक्षण आणि एजिंगच्या प्रक्रियेचा वेळ कमी करते.   (डिस्क्लेमर - वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)