बंदी असतानाही अन्सारी कुटुंब धबधब्याकडे गेलं अन्...; हे पाच प्रश्न तुम्हालाही विचार करायला लावतील

लोणावळ्यात (Lonavla)वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  भुशी डॅमच्या (Bhushi Dam) मागील धबधब्यावर मौजमजा करताना अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यातील काही जणांचे मृतदेह सापडले आहेत. नेमकी ही दुर्घटना कशी घडली हे जाणून घेऊया.

| Jul 01, 2024, 13:56 PM IST

Lonavala Waterfall Tragedy: लोणावळ्यात (Lonavla)वर्षा सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.  भुशी डॅमच्या (Bhushi Dam) मागील धबधब्यावर मौजमजा करताना अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. त्यातील काही जणांचे मृतदेह सापडले आहेत. नेमकी ही दुर्घटना कशी घडली हे जाणून घेऊया.

1/7

बंदी असतानाही अन्सारी कुटुंब धबधब्याकडे गेलं अन्...; हे पाच प्रश्न तुम्हालाही विचार करायला लावतील

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

भुशी डॅम बॅक वॉटरफॉल घटनेतील आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. धबधब्यात 10 जण अडकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. धबधब्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने सगळेजण एकमेकांना पकडून आपला जीव वाचण्याचा प्रयत्न करत होते. 

2/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात अन्सारी कुटुंब राहत होतं.  वर्षा सहलीसाठी हे कुटुंब इथं आलं होतं. अन्सारी कुटुंबात 27 तारखेला लग्नसमारंभा पार पडला होता. यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आल्याने त्यांनी लोणावळ्यात वर्षा सहलीचा बेत आखला होता.

3/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

लोणावळ्याच्या ज्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेलं. तिथे एरवी पाण्याचा फारसा प्रवाह नसतो. दुर्घेटनेच्या आधीही पाण्याचा प्रवाह फारसा नसल्याने अन्सारी कुटुंबा तिथल्या खडकावर उभे होते.

4/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

 मात्र अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अन्सारी कुटुंब तिथे अडकून पडले. ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र 5 जण प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत.  

5/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

बंदी असताना देखील अन्सारी कुटुंब या धबधब्याकडे गेलं आणि आपला जीव गमावला, अशी माहिती समोर येत आहे.   

6/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

लोणावळ्यात पर्यटन करताना सावधानता बाळगा असा इशारा देऊन ही पर्यटक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे, भुशी डॅम परिसरात फिरायला आलेल्या पर्यटकांना प्रशासनाने सूचना फलक द्वारे सूचित केलं असताना देखील पर्यटक याकडे काना डोळा करतात, अशी माहिती समोर आली आहे.   

7/7

 5 of family from Pune swept away near dam in Lonavala

या दुर्घटनेनंतर हे पाच सवाल तुम्हालाही विचार करायला लावतील - दुर्गम भागातील पावसाळी पर्यटनावर निर्बंधांचे पालन का होत नाहीत ? - धोकादायक ठिकाणी प्रवेश निषिद्ध का नाही ? -चेक पोस्ट किंवा सुरक्षारक्षक कुठे असतात? - अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्याची यंत्रणा कुठे आहे? - धोकादायक स्थळासंबंधीचा सूचना फलक स्पष्टपणे दिसेल असा का नाही ?