नवीन वर्षात बँक लॉकरच्या नियमांसह होणार हे 6 मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rules Changes from 1 January 2023: नवीन वर्ष 2023 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकर नियमांमध्ये बदल होणार आहेत. चला जाणून घेऊयात या बदलांबाबत
1/6
नवीन वर्षात कार खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. Maruti Suzuki, Hyundai Motor, Tata Motors, Mercedes-Benz, Audi, Renault, Kia India आणि MG Motor ने 1 जानेवारी 2023 पासून किमतीत वाढ जाहीर केली आहे. Honda Cars कारची किंमत 30,000 रुपयांनी वाढवणार आहे. त्याच वेळी, टाटा मोटर्सने 2 जानेवारी 2023 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
2/6
3/6
4/6
मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड करणाऱ्यांबाबत सरकारने कडक नियमावली केली आहे. प्रत्येक मोबाईल फोन उत्पादक, आयात आणि निर्यात फर्मसाठी प्रत्येक फोनच्या IMEI क्रमांकाची नोंदणी आवश्यक असेल. परदेशी प्रवाशांसोबत आलेल्या फोनचीही नोंदणी करणे बंधनकारक असणार असून त्यांना सेल्फ-सर्टिफिकेशनही बंधनकारक असणार आहे. यामुळे चोरीच्या प्रकरणात फोन ट्रॅक करणे सोपे होईल.
5/6
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट आणि फी स्ट्रक्चर बदलेल. बँकेच्या थर्ड पार्टी मर्चंटद्वारे भाडे भरल्यास व्यवहाराच्या एकूण रकमेवर 1 टक्के शुल्क आकारेल. वेगवेगळ्या कार्डांसाठी रिवॉर्ड सिस्टम वेगळी असेल. 1 जानेवारी 2023 पासून, SBI कार्ड्सने त्यांच्या SimplyCLICK कार्डधारकांसाठी काही नियम बदलले आहेत.
6/6