समृद्धी महामार्गाला अपघाताचे ग्रहण; एसटीला धडक देऊन टीप्परचा चालक फरार

नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे.  सातत्याने होत असलेले भीषण अपघात आता चिंतेचा विषय बनला आहे. या महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने अपघात होताना दिसत आहेत.

Mar 24, 2023, 11:47 AM IST

समृद्धी महामार्गावर अवजड वाहनांसाठी 80 इतर वाहनांसाठी 100 ते 120 इतकी वेग मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. मात्र वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून सुसाट वेगाने जात असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहे

1/7

Samruddhi highway

शुक्रवारी सकाळी समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

2/7

ST bus tipper accident

रेती वाहून नेणाऱ्या टीप्परची धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटीमधून प्रवास करणारे 17  प्रवासी जखमी झाले आहेत. 

3/7

buldhana bus accident

बुलढाण्यातील शेगाववरून मेहकरकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्य बसला टीप्पर चालकाने जोरदार धडक दिली.

4/7

accident near Samrudhi highway bridge

मेहकरजवळील समृध्दी महामार्गाच्या पुलाजवळ हा अपघात झाला. यामध्ये 17 प्रवासी जखमी झाले आहेत.

5/7

ST Bus accident

एसटी महामंडळाची बस मेहकरच्या दिशेने येत होती. त्यावेळी महामार्गावरील पुलाजवळ टिप्परने अचानक टर्न घेतल्याने एसटी आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली.

6/7

buldhana police

या अपघातानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन फरार झाला आहे.महामार्ग पोलीस सध्या टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.

7/7

Most accidents near Mehkar in Buldhana

दरम्यान, बुलढाण्यातील मेहकरजवळ सर्वाधिक अपघात होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. बुलढाण्यात आतापर्यंत 41 च्या आसपास अपघात झाले आहेत.