लग्नाआधी 75 मुलींना केलं डेट, गर्लफ्रेंड प्रेग्नेंट होताच उरकलं लग्न, 'हा' अभिनेता मिस इंडियासोबत करतोय संसार!

लग्नाआधी अभिनेत्याने 75 मुलींना केलं डेट, गर्लफ्रेंड प्रेग्नेंट होताच घाईघाईत उरकलं लग्न, कोण आहे हा अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

Soneshwar Patil | Feb 06, 2025, 15:20 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 6 फेब्रुवारी 1983 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला अंगद  बेदी हा माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे.

2/7

अंगद बेदीने 19 वर्षांखालील क्रिकेट देखील खेळले आहे. तथापि, नंतर त्याने मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि अभिनयाकडे वळला. 

3/7

त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्याने शशी कुमार दिग्दर्शित 'काया तरण' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

4/7

अंगद बेदीच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे. त्याने 10 मे 2018 रोजी नेहा धूपियाशी लग्न केलं. दोघांनीही अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि लग्न केले.

5/7

नेहा अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्याचं म्हटले जाते.त्यासोबतच नेहा धूपिया लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती. तिने नोव्हेंबर 2018 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता. म्हणूनच त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली.

6/7

एका मुलाखतीत अंगदने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. नेहा धूपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये त्याने सांगितले की लग्नापूर्वी त्याने 75 मुलींना डेट केले होते. 

7/7

ज्यामध्ये काही मुली त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या देखील होत्या. मुंबईत आल्यानंतर त्याने नवीन मित्र बनवले आणि अनेक मुलींशी डेटही केले.