शेतकरी मुलाचं ते पत्र वाचून प्राजक्ता माळी आईला म्हणाली- ‘मला लग्न करायचंय!’

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  

Soneshwar Patil | Feb 21, 2025, 18:23 PM IST
1/7

प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

2/7

सध्या ती तिच्या चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळ्या पद्धतीने करत आहे. अनेक ठिकाणी ती भेट देत आहे. अशातच प्राजक्ता माळीला एका शेतकरी मुलाने थेट पत्राद्वारे लग्नाची मागणी घातली आहे. 

3/7

नुकतीच प्राजक्ता माळी सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनेलवरील 'आम्ही असं ऐकलंय' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यामध्ये तिने सांगितले की, मी लग्नाला तयार आहे आणि आईला मुलं बघण्यासाठी परवानगी दिली आहे. 

4/7

त्यासोबत प्राजक्ता माळीला दोन मुलांनी थेट पत्राद्वारे लग्नाची मागणी घातली आहे. यामध्ये एक मुलगा शेतकरी आहे. ज्याचे पत्र प्राजक्ता माळीला खूप आवडले आहे. 

5/7

प्राजक्ता म्हणाली की,  मी आता आईला लग्नासाठी मुलं शोधण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या शेतकरी मुलाचे पत्र वाचून तिला त्या मुलाला फोन लावावा असं वाटलं. 

6/7

कारण त्या पत्रामध्ये त्याने म्हटले होते की, मी शेतकरी आहे. मला माहिती आहे की मी खूप वेगळ्या पद्धतीने बोलतोय. कारण तुमचं क्षेत्र वेगळं आहे. हे मला प्रांजळपणे मांडायचं आहे.

7/7

मी शेतकरी आहे. मी शेतीचं करणार आहे. तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. असं त्याने पत्रामध्ये म्हटले होते.