अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

Suruchi Adarkar Marriage: लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिचा लग्नसोहळा पार पडला आहे. आज 6 डिसेंबर रोजी तिनं अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले. आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून तिनं आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं गुपचूप उरकलेल्या या लग्नाची बरीच चर्चा आहे. 

Dec 06, 2023, 22:18 PM IST

Suruchi Adarkar Marriage: अभिनेत्री सुरूची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांचा विवाहसोहळा आज पार पडला. यावेळी त्या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. पियुष रानडेनं तिसऱ्यांदा लग्न केले आहे. यावेळी आपल्या पतीविषयी बोलताना सुरूचीनं खुलासा केला आहे. 

1/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

suruchi adarkar

लोकप्रिय अभिनेत्री सुरूची अडारकर हिनं अभिनेता पियुष रानडे याच्याशी लग्न केले आहे. यावेळी तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून आपल्या चाहत्यांना आपल्या लग्नाची गोड बातमी दिली. 

2/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

suruchi adarkar wedding

यावेळी चाहत्यांनी तिच्या या सुंदर रोमॅण्टिक फोटोवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे सध्या तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. यावेळी तिनं आपल्या नात्याविषयी खुलासा केला आहे. 

3/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

suruchi adarkar serial

'का रे दुरावा', 'अंजली' अशा अनेक मराठी मालिकांतून तिनं प्रमुख भुमिका साकारल्या आहेत. 'का रे दुरावा' या मालिकेतील तिची आणि अभिनेता सुयश टिळक यांची जोडी प्रचंड गाजली होती. 

4/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

suruchi adarkar marriage photos

जय आणि अदिती अशी ही टेलिव्हिजनवरील जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून होती. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातही सुरूची वंदना गुप्ते यांच्या मुलीची भुमिका साकारली होती. 

5/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

suruchi adarkar husband

सुरूचीची अनेकदा चर्चा असते. सोशल माीडियावरही ती खूपच सक्रिय आहे. तिच्या फोटोंनाही चाहत्यांची वाहवा मिळत असते. सुरूचीचे हे पहिलं लग्न असलं तरी पियुष रानडेचे हे तिसरे लग्न आहे. प्रथम त्यानं अभिनेत्री शाल्मली टोळ्ये हिच्याशी लग्न केले होते. त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर 'अस्मिता' फेम अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याशी तिनं लग्नगाठ बांधली परंतु त्यांचाही घटस्फोट झाल्याचे समोर आले. 

6/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

piyush ranade

यावेळी सुरूची आणि पियुष यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचेही फोटो समोर आले आहेत. अभिनेत्री सुरूची अडारकरनं हे फोटो शेअर केले आहे. आज त्यांचा विवाहसोहळा पार पडला हे या पोस्टवरून समजते. #PSIloveyou असा हॅशटॅग ट्रेण्ड होतो आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये 6.12.2023 असं लिहिलं आहे. हा लग्नसोहळा पुण्यात पार पडला. 

7/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

piyush ranade news

सुरूची आणि पियुष यावेळी सुंदर असे ट्विनिंग केले होते. त्यांनी पिवळ्या रंगांचे सुंदर एकमेकांना साजेसे असे कपडे परिधान केले होते. यावेळी सुरूचीनं पिवळ्या रंगांची काठपदराची साडी नेसली होती. तिनं सुंदर असे सोन्याचे आणि मोत्याचे दागिने परिधान केले होते. तिनं गुलाबी रंगाचा शेला परिधान केला होता. पियुषनंही पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि सोबतच पिवळ्या रंगाचा शेला घेतला होता. 

8/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

piyush ranade third marriage

यावेळी ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सुरूचीनं आपल्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. ती म्हणाली, ''मी आज खूप आनंदी आहे. तुम्हाला सांगू शकत नाही की मी आता किती आनंदी आहे. ही भावना खूप चमत्कारिक आणि अतिशय वास्तविक आहे.  मला फार आनंद झाला आहे की मी सर्वात सुंदर माणसाशी लग्न केले आहे. तो मनानं खूपच सुंदर माणूस आहे. तो भावनिक आहे सोबतच काळजी घेणारा देखील आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान आणि नशीबवान मानते.'' अशी भावना तिनं व्यक्त केली. 

9/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

piyush ranade third marriage news

''मी सगळंच खाजगी ठेवते. त्यामुळे हे लग्नही अत्यंत खाजगी आणि इंटिमेट असावं त्यामुळे आम्ही आमच्या जिवलग मित्रमंडळी आणि परिवारासोबत हा विवाहसोहळा संपन्न केला.'' असंही ती म्हणाली. 

10/10

अभिनेत्री सुरुची अडारकरच्या पहिल्या पतीच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट... सांगितलं कारण

piyush ranade serials

यावेळी पियुष रानडे आणि सुरूची अडारकरच्या लग्नाची गोष्ट जगासमोर आली आहे. अनेक सेलिब्रेटींनीही त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुयश टिळक, सुबोध भावे, तेजश्री प्रधान, अमृता देशमुख, अभिजित खांडकेकर, ऋतूजा बागवे, प्रसाद जवादे, अमृता देशमुख, प्रार्थना बेहेरे, आदिश वैद्य, तेजस्विनी लोणारी, फुलवा खामकर, अक्षय वाघमारे, दीपा चौधरी, नमिता धुरी, हर्षदा खानविलकर अशा अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या फोटोवर कमेंट केली आहे.