तापसीचा बॉयफ्रेण्डबरोबर मालदीवमध्ये Romantic अंदाज! फोटो पोस्ट करत म्हणाली, 'त्याच्या कुशीत..'

Taapsee Pannu Boyfriend Maldives Photos: अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या 'डंकी' चित्रपटामध्ये चर्चेत आहे. तापसीने किंग खान शाहरुख खानबरोबर या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेची सध्या चर्चा होत असतानाच ती मात्र सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीवला गेली आहे. आपल्या निकटवर्तीयांबरोबर ती मालदीवमध्ये गेली असून तिने येथील काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका फोटोमध्ये तिला बॉयफ्रेण्डही दिसतोय...

| Jan 03, 2024, 14:29 PM IST
1/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

अभिनेत्री तापसी पन्नूने नवीन वर्षाचं स्वागत आपला प्रियकर मॅथियास बो आणि बहीण शगुन पन्नूबरोबर केलं.  

2/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

'मनमर्जिया' फेम अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमधून अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो मालदीवमधील सुट्टीदरम्यानचे आहेत.

3/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसी अनेकदा तिच्या निकटवर्तीयांबरोबर भटकंतीसाठी जात असते.

4/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

 खास करुन जवळच्या मैत्रीणी आणि बहिणीबरोबर तापसी परदेशात बरीच भटकंती करते.

5/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसी या फोटोंमधील काही फोटोंमध्ये बहीण शगुन पन्नूबरोबर पोज देताना दिसत आहे.

6/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसीने पोस्ट केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ती निळ्या रंगाच्या साडीत दिसली. 'चेहऱ्यावर हास्य आणि साडीसहीत 2024 मध्ये प्रवेश करतेय,' असं तिने म्हटलं होतं. 

7/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

या सुट्ट्या माझ्या आवडत्या सुट्ट्यांपैकी एक आहेत. मालदीव ही अशी जागा आहे जिथे मला परत परत यायला आवडतं, अशा कॅप्शनसहीत तापसीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवरुन फोटो शेअर केले होते.

8/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

अन्य एका फोटोमध्ये तापसी तिच्या प्रियकराच्या कुशीत दिसत आहे. दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसतायत. '...आणि त्याच्या कुशीत' अशी कॅप्शन या फोटोला तापसीने दिलेली.

9/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

प्रियकर मॅथियास बोबरोबर तापसीचे फार मोजके फोटो सोशल मीडियावर आहेत.

10/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसी प्रियकर मॅथियास बो बरोबरचे फार कमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. 

11/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

भटकंतीची आवड असलेल्या तापसीचा प्रियकर प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकही जिंकलं आहे.

12/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसी तिच्या प्रियकराबद्दल फारसं बोलत नाही. तिला खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या बोलायला आवडत नाही.

13/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

मध्यंतरी तापसीचं नाव साकिब सलमी आणि टॉलीवूड अभिनेता महंत राघवेंद्रबरोबरही जोडलं जात होतं. 

14/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसीने  'पिंक', 'द गाजी अटॅक', 'नाम शबाना', 'जुडवां 2' या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

15/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसीने तेलगूमधील 'जुमानडी नद्दम' चित्रपटामधून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.

16/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

अभिनयानंतर आता तापसी निर्मिती क्षेत्रात पदार्पणाच्या तयारीत आहे.

17/17

taapsee pannu romantic photo with boyfriend mathias boe vacation in maldives

तापसी लवकरच तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली 1 वेब सीरीज आणि एका चित्रपटाची निर्मिती करत आहे.