रश्मिकाची गळाभेट घेताना तोंड वाकडं करणाऱ्या आलियाची नवी पोस्ट, म्हणते 'तू फार...'

गॅन्गस्टर अशी थिम असलेला अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दुसरीकडे एक चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे आलिया आणि रश्मिकाच्या व्हिडीओची. प्रीमियरनंतर रश्मिकाला मिठी मारताना आलियानं ज्या प्रकारे एक्सप्रेशन दिले त्यावरून ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत होती. दरम्यान, आलियानं आता एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती काय म्हणाली हे जाणून घेऊया. 

| Dec 02, 2023, 19:12 PM IST
1/7

दिग्दर्शक संदीप वांगा

आलियानं दिग्दर्शक संदीप वांगा यांच्यासाठी या स्टोरीमध्ये म्हणाली की 'संदीप रेड्डी वांगा तुमच्यासारखं कोणीच नाही. चित्रपटात असलेली एक-एक गोष्ट शॉकिंग आहे, सरप्रायझिंग आणि अंगावर शहारे येतील असा आहे. '

2/7

रश्मिकासाठी आलियानं लिहिलं

या स्टोरीमध्ये रश्मिकासाठी आलियानं लिहिलं की 'तू खूप-खूप सुंदर आणि चित्रपटात प्रामाणिकपणे काम केलं आहे. मी तुला म्हटलं होतं की... मला त्या सीनमध्ये तू आवडलीस. खूप स्पेशल आणि प्रेरणादायी होतं. मी क्रशमिका क्लब जॉइन करते.'

3/7

बॉबी देओलविषयी आलिया म्हणाली

'बॉबी, तुम्ही माझे आवडते आहात. खूप सुंदर. जेव्हा जेव्हा तुम्ही स्क्रिनवर येता. तेव्हा तुम्ही एखाद्या जादू सारखे दिसता', असं आलिया म्हणाली. 

4/7

अनिल कपूर

अनिल कपूर यांच्यासाठी आलियानं लिहिलं की, 'एकमेव अनिल कपूर आहेत ज्यांनी नेहमीप्रमाणे धम्माल केली आहे. हे खूप प्रेरणादायी आहे.' 

5/7

तृप्ती दिमरी आणि शक्ती कपूर

आलिया तृप्ती दिमरी आणि शक्ती कपूर यांच्यासाठी म्हणाली की संपूर्ण कास्टला शुभेच्छा. खूप अप्रतिम अभिनय. त्यामुळे पात्र जिवंत आहेत असं वाटतं.   

6/7

आलियाची पोस्ट

आलियानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 

7/7

आलियाची पोस्ट पाहताच रश्मिका म्हणाली...

रश्मिकानं आलियाची ही पोस्ट रिशेअर करत कॅप्शन दिलं की 'खूप खूप प्रेम आणि लव्ह यू' (All Photo Credit : Social Media)