'या' व्यक्तीमुळे आलिया भट्टचे करिअर घडले, ऐश्वर्या रायने केला मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे करिअर 'या' व्यक्तीमुळे घडले. 'तिच्यासाठी अवघड नाही' म्हणत ऐश्वर्या रायने केला मोठा खुलासा

Oct 05, 2024, 14:24 PM IST
1/7

प्रमोशनमध्ये व्यस्त

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ती अॅक्शन अवतारात दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. 

2/7

मोठे प्रोजेक्ट

करण जोहर आणि आलिया भट्ट अनेक वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. तिला करणचे अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले आहेत. 

3/7

जुना व्हिडीओ

करण जोहर सुरुवातीपासूनच आलियाला आपली मुलगी म्हणत आहे. अशातच आता ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

4/7

फन्ने खां

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय म्हणत आहे की, करणमुळे आलिया भट्टला करिअर मिळाले आहे. हा व्हिडीओ 2018 चा आहे. जिथे ऐश्वर्या राय तिच्या 'फन्ने खां' चित्रपटाचे शूटिंग करत होती. 

5/7

आलियाचे करिअर

यावेळी तिने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, करणच्या पाठिंबा असल्यामुळे आलियाला तिच्या करिअरमध्ये चांगले काम मिळाले आहे. 

6/7

करण जोहरचा पाठिंबा

ती म्हणाली की, मी तिला सांगितले होते की हे तुझ्यासाठी चांगले आहे. करणने तिला सुरुवातीपासून दिलेला पाठिंबा हे सर्व मिळणे खूप सोपे आहे. कारण नंतर कोणतीही अडचण नाही. 

7/7

जिगरा चित्रपटाची कथा

आलियाचा 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित आहे.